अपघाताबाबतची हयगय कोणाची?

रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाविषयी याच सदरामध्ये अनेक वेळा लिहिले आहे. अन्य सर्व माध्यमेही सातत्याने त्यावर लिहीत आहेत. दृक्श्राव्य माध्यमेही त्यात मागे नाहीत; पण निर्ढावलेली संबंधित यंत्रणा कशाचीच दखल घेत नाही, हेही स्पष्ट झाले आहे. असाच एक अनुभव हातखंब्याजवळ नुकत्याच झालेल्या अपघाताने आला. महामार्ग प्रशासनाच्या चुका आणि त्रुटींबरोबरच प्रसारमाध्यमांच्या अतिघाईमुळे झालेला मानसिक त्राससुद्धा अनुभवता आला

हातखंबा कार अपघातात दोघे बचावले; अन्य ठिकाणी चुकीच्या माहितीसह बातमी प्रसारित

हातखंबा (ता. जि. रत्नागिरी) येथे आज (२८ सप्टेंबर २०२५) दुपारी दोनच्या सुमारास ह्युंडाई ग्रँड आय टेन कारचा अपघात झाला आणि ती जळून खाक झाली. गाडीतून प्रवास करत असलेले वडील आणि मुलगी बचावले आहेत; मात्र काही न्यूज पोर्टल्स आणि ग्रुप्स यांनी पोलिसांकडून शहानिशा न करता ब्रेकिंग न्यूज देण्याच्या नादात चुकीच्या तपशीलासह बातम्या प्रसारित केल्या आहेत. त्यामुळे गैरसमज दूर करण्यासाठी ही बातमी देत आहोत.

खासगी बस व रिक्षाने किती भाडे घ्यावे? रत्नागिरी ‘आरटीओ’कडून दरतक्ता प्रसिद्ध; पालन न झाल्यास करा तक्रार

खासगी बसने किती जास्तीत जास्त किती भाडे आकारावे आणि मीटरप्रमाणे व शेअर रिक्षाचे दर किती असावेत, याबाबतचे दरतक्ते आरटीओ कार्यालयाने प्रसिद्ध केले आहेत. त्याचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

खासगी बसने अवाजवी भाडे घेतले? रिक्षाचालक उद्धट वागला? लगेच तक्रार करा व्हॉट्सअ‍ॅपवर

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणीचे अनेक प्रकार घडतात. रिक्षाचालक किंवा बस वाहतूकदारांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तनाचे प्रकारही घडतात. आता प्रवाशांना त्याबद्दलची थेट तक्रार व्हॉट्सअ‍ॅपवर करता येणार आहे.

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसवण्याकरिता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याकरिता ३० नोव्हेंबर २०२५पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

गॅस टँकर्सच्या सुरक्षित वाहतुकीसाठी कठोर उपाययोजना; विशेष बैठकीत पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांचे आदेश

हातखंब्यातील टँकर अपघातांच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्या बैठकीला गॅस, कंपन्यांचे प्रतिनिधी, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाचे कंत्राटदार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते. गॅस टँकरच्या अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित यंत्रणांना योग्य त्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.