मुंबई : एक एप्रिल २०१९पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसवण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अशा जुन्या वाहनांना HSRP बसवण्यासाठी यापूर्वी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि ही पाटी बसवण्यासाठी वाहनमालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याकरिता ३० नोव्हेंबर २०२५पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
वाहन मालकांनी वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ३० नोव्हेंबर २०२५पर्यंत अपॉइंटमेंट घ्यावी. त्यानंतरही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी न बसवणाऱ्या वाहनांवर एक डिसेंबर २०२५ नंतर वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. तथापि, दिनांक ३०.११.२०२५पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, याची सर्व संबंधित वाहनमालकांनी नोंद घ्यावी. एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसवावी, असे आवाहन सह-परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

