रत्नागिरी : नाणीज येथील रहिवासी संजय मधुकर वाईरकर (वय ५२) यांचे १२ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झाले. जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रेरणेने आणि दिवंगत वाईरकर यांच्या इच्छेनुसार, त्यांचे नातेवाईक आणि स्व-स्वरूप संप्रदायाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पार्थिव रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केले. रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेले हे दहावे देहदान असून, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ-नाणीजधाम रामानंदाचार्य संप्रदायामार्फत जिल्ह्यातून झालेले हे तिसरे देहदान आहे.
नाणीज येथील रहिवासी संजय मधुकर वाईरकर यांना ऑगस्ट २०१६पासून त्यांना मूत्रपिंडाचा विकार होता. किडनी निकामी झाल्याने त्यांचे डायलिसिस सुरू होते. १२ ऑगस्टला त्यांचे निधन झाले. दिवंगत वाईरकर यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केलेली होती. त्यानुसार देहदान करण्यात आले. त्यांचे पार्थिव शरीर सुपूर्द करताना त्यांची पत्नी स्नेहल वाईरकर, मुली तनया आणि पूजा संजय वाईरकर, बहिणी, भाऊ, तसेच संप्रदायाचे पदाधिकारी संदीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष अनिता जाधव, डॉ. रवींद्र केसरकर, स्नेहल साळवी, विशेष कार्यवाहक प्रजापती नेत्रा कामत, रत्नागिरी जिल्हा युवक अध्यक्ष गोरक्ष साळवी, प्रवीण ठाकूरदेसाई, निखिल जाधव, श्रीकृष्ण तुपे आणि ज. न. म. संस्थान कर्मचारी उपस्थित होते. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाईरकर यांचा पार्थिव देह स्वीकारला. या पथकात डॉ. योगिता कांबळे, डॉ. मंजुळा रावळ, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव, लिपिक पूर्वा तोडणकर, प्रयोगशाळा सहायक भूमी पारकर, शिपाई मिथिलेश मुरकर आणि मिहिर लोंढे यांचा समावेश होता.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

