मालगुंडमधील सुप्रिया कुंटे यांचे देहदान

रत्नागिरी तालुक्यातील मालगुंडमधील नवींद्रनगरमध्ये राहणाऱ्या सुप्रिया श्रीपाद कुंटे यांचे १० सप्टेंबरला निधन झाले. त्या ऐंशी वर्षांच्या होत्या. त्यांचे देहदान करण्याचा निर्णय त्यांचे पुत्र सुबोध कुंटे यांनी घेतला.

नाणीजमधील संजय वाईरकर यांचे देहदान

नाणीज येथील रहिवासी संजय मधुकर वाईरकर (वय ५२) यांचे १२ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झाले. जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रेरणेने आणि दिवंगत वाईरकर यांच्या इच्छेनुसार, त्यांचा देह दान करण्यात आला.

खेडशीच्या विमल पेडणेकर यांनी केले देहदान

रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज सातवे मरणोत्तर देहदान झाले. श्रीमती विमल शंकर पेडणेकर (वय ८५, रा. खेडशी नाका, रत्नागिरी) यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी आपला देह दान केला.

रत्नागिरीतील मुरलीधर मंदिराचे पुजारी वासुदेव सप्रे यांचे मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान

मुरलीधर मंदिराचे पुजारी या नात्याने सुमारे ६० वर्षं ईशसेवा केलेल्या वासुदेव बाळकृष्ण सप्रे यांनी मृत्यूनंतरही आपला सेवेचा वसा कायम राखला आहे.

सुवर्णमहोत्सवानिमित्ताने रत्नागिरी लायन्स क्लबचे विविध संकल्प

रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे ९ सप्टेंबरपासून सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टने नवनवीन संकल्प केले आहेत. त्याविषयीची माहिती लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरीच्या लायन्स क्लब नेत्ररुग्णालयात नेत्रदानाची सुविधा सुरू

रत्नागिरी : रत्नागिरीतील लायन्स क्लब नेत्र रुग्णालयात नेत्रदानाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प करून तेथे नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.