खेडशीच्या विमल पेडणेकर यांनी केले देहदान

रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज सातवे मरणोत्तर देहदान झाले. श्रीमती विमल शंकर पेडणेकर (वय ८५, रा. खेडशी नाका, रत्नागिरी) यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी आपला देह दान केला.

श्रीमती पेडणेकर यांचे काल, दि. २५ जून रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी श्रीमती माधवी मधुकर नाखरेकर यांनी मातोश्रींचा देह वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी दान करण्याचा निर्णय घेतला. या कार्यामध्ये त्यांची नात सौ. मंजिरी नाखरेकर, नातजावई, तसेच सुहास पालेकर व सागर भिंगारे यांनीही मोलाचे सहकार्य केले. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

या देहदान प्रक्रियेस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव, तसेच विभागातील कर्मचारी पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, मिथिलेश मुरकर आणि मिहिर लोंढे यांनी सहकार्य केले.

श्रीमती विमल पेडणेकर यांचे हे पवित्र कार्य भावी वैद्यकशास्त्रज्ञांना ज्ञानसंपन्न करण्यासाठी उपयुक्त ठरणार असून, त्यांच्या कुटुंबियांनी दाखवलेली सामाजिक जाण आणि वैचारिक परिपक्वता प्रेरणादायी आहे, अशी भावना महाविद्यालय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply