गणपतीला कोकणात येणाऱ्या मुंबईकरांसाठी नीतेश राणेंकडून यंदा दोन मोदी एक्स्प्रेस

मुंबई : गणेशोत्सवाकरिता कोकणात येणाऱ्या मुंबई आणि परिसरातील चाकरमान्यांकरिता मंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून यंदा दोन मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे हे तेरावे वर्ष आहे. गणपतीला कोकणात जाण्यासाठी नीतेश राणे यांच्या माध्यमातून गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेस विशेष रेल्वे सेवा गेली १२ वर्षे नागरिकांच्या सेवेत आहे. यंदा ही सेवा स्पेशल असून दोन ट्रेन नागरिकांच्या सेवेत सज्ज होणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणातील जनतेने भारतीय जनता पक्ष आणि राणे कुटुंबीयांना भरभरून दिले आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडीच्या जनतेने तिसऱ्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे या वर्षी कोकणवासीयांच्या सेवेसाठी दोन विशेष ट्रेन सोडण्यात येणार असून, सर्व प्रवासी भक्तांसाठी मोफत जेवण आणि पाण्याची व्यवस्था असल्याची माहिती नीतेश राणे यांनी दिली.

गणपती २७ ऑगस्ट रोजी येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर, २३ आणि २४ ऑगस्ट २०२५ अशा दोन दिवशी सकाळी ११ वाजता दादर रेल्वे स्थानकावरून या विशेष रेल्वे सुटणार आहेत. याचे तिकीटवाटप सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार आहे. तिकिटासाठी नागरिकांनी आपापल्या मंडळ अध्यक्षांकडे नाव नोंदणी करायची आहे. २३ ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून सकाळी ११ वाजता सुटणारी ट्रेन रत्नागिरी आणि कुडाळला थांबेल. या गाडीचा अंतिम थांबा सावंतवाडी असेल. २४ ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४वरून सकाळी ११ वाजता सुटणारी ट्रेन वैभववाडी आणि कणकवली येथे थांबेल. या डबल धमाका स्पेशल मोदी एक्स्प्रेसचा लाभ सर्व कोकणवासीयांनी घ्यावा, असे आवाहन मंत्री नीतेश राणे यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply