गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून
कोकणातील चाकरमान्यांसाठी सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी मोदी एक्स्प्रेस
आज दादर रेल्वे स्थानकावरून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून
कोकणातील चाकरमान्यांसाठी सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी मोदी एक्स्प्रेस
आज दादर रेल्वे स्थानकावरून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाली.
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळ गावी म्हणजेच रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे आज (९ नोव्हेंबर) मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते शिलालेखाचे अनावरण करण्यात आले.
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज (७ ऑक्टोबर २०२५) रोजी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी व मच्छिमारांच्या बोटींच्या नुकसानभरपाईसाठी १०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
कोकणात तीन नव्या जेटी उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली असून, महाराष्ट्र सागरी प्राधिकरणाकडून सीआरझेडसंदर्भातील मंजुरीही मिळाली आहे.
कोकणाच्या विकासाला चालना देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातलं जयगड बंदर हे एक महत्त्वाचं केंद्र (हब) म्हणून विकसित केलं जाणार आहे. त्याला कोकणाला राज्याच्या अन्य भागाशी जोणाऱ्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचीही जोड दिली जाईल. यामुळे कोकणवासीयांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होईल, असं प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकासमंत्री नीतेश राणे यांनी आज (११ सप्टेंबर) जयगडमध्ये केलं.
गणेशोत्सवाकरिता कोकणात येणाऱ्या मुंबई आणि परिसरातील चाकरमान्यांकरिता मंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून यंदा दोन मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत.