छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोटचा पुतळा पूर्णपणे सुरक्षित; भराव किंचित खचल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य अभियंत्यांचा निर्वाळा

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि चबुतरा पूर्णपणे मजबूत, सुरक्षित आणि सुस्थितीत असल्याचा निर्वाळा सार्व‍जनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज यांनी आज (१६ जून) दिला. त्यांनी आज पुतळ्याची आणि परिसराची पाहणी केली.

पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जगात कुठेही झाले नसेल, असं स्वागत महाराष्ट्रात : डॉ. उदय सामंत

‘पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं जगात कुठेही झालं नसेल, असं स्वागत महाराष्ट्रात होत आहे. आपलं मूल जिल्हा परिषद शाळेत शिकतंय, याचा पालकांना अभिमान असला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून माझ्यासारख्या अनेकांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे,’ असं प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री आणि मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत यांनी केलं.

मुलांच्या किलबिलाटाने शाळा पुन्हा गजबजल्या; रत्नागिरीत प्रवेशोत्सव उत्साहात

सुमारे दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज (१६ जून) नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे शाळा पुन्हा मुलांच्या किलबिलाटाने गजबजल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करून विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात १० हजार १२१ विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे.

खेडशीच्या स्वरूपानंद वसाहत जि. प. शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

उन्हाळी सुट्टीनंतर आज, १५ जून रोजी राज्यातील शाळा पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटाने भरून गेल्या. रत्नागिरी तालुक्यातील खेडशी गावातील गयाळवाडी येथील स्वामी स्वरूपानंद वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

खेडशी गावाने नववर्षदिनी केले विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, एक जानेवारी २०२४ रोजी रत्नागिरी तालुक्यातल्या खेडशी गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत करण्यात आले.

रक्तदाता दिनी पोलीस पाटील करणार रक्तदान

रत्नागिरी : दरवर्षी १४ जून रोजी साजरा केला जाणारा ‘रक्तदाता दिवस’ रत्नागिरी तालुक्यातील पोलीस पाटील रक्तदान करून साजरा करणार आहेत. याबाबत नियोजन सुरू असून रक्तदान करणाऱ्यांची नोंदणी सुरू आहे.