रत्नागिरी : दरवर्षी १४ जून रोजी साजरा केला जाणारा ‘रक्तदाता दिवस’ रत्नागिरी तालुक्यातील पोलीस पाटील रक्तदान करून साजरा करणार आहेत. याबाबत नियोजन सुरू असून रक्तदान करणाऱ्यांची नोंदणी सुरू आहे.
करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी आवश्यक भासल्यास रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ते आयोजित करताना करोनाप्रतिबंधक उपायांसाठी सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही गर्दीशिवाय शिबिर पार पाडले जाणार आहे. त्याकरिता रक्तदात्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील इच्छुक रक्तदात्यांनी आपल्या विभागातील पोलीस पाटलांकडे नावे नोंदवावीत. रक्तदान शिबिराची पहिलीच वेळ असल्याने सर्व पोलीस पाटलांनीही शिबिरात रक्तदान करून उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. आपल्याबरोबरच इतरांनाही रक्तदानाला प्रवृत्त करून रक्तदान शिबिर यशस्वी करावे, असे आवाहन रत्नागिरी तालुका पोलीस पाटील संघटनेने केले आहे.
हे रक्तदान शिबिर खेडशीतील गयाळवाडी फाट्याजवळच्या रिसबूड सभागृहात होणार आहे. उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार, पोलीस निरीक्षक सुरेश कदम, जयगड विभाग पोलीस निरीक्षक, शहर विभाग पोलीस निरीक्षक, पावस विभाग निरीक्षक उपस्थित राहणार आहेत. शिबिर सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. अधिक माहितीसाठी किंवा नावनोंदणीसाठी संतोष सकपाळ (९७६५४१५९१९), शलाका सावंत (९३७३७५०१०६), स्वाती जाधव (७०२०८२९१९९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
Khedshi people ni kothe yave?
कृपया बातमीत पत्ता दिला आहे, तो पाहावा