नारायण राणेंच्या लाइफटाइम हॉस्पिटलमध्ये करोना तपासणी लॅबचे उद्घाटन

कुडाळ : पडवे (ता. कुडाळ) येथे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सुरू केलेल्या लाइफटाइम हॉस्पिटलमध्ये आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून मिळालेल्या निधीमधून आरटीपीसीआर (कोविड मोलेक्युलर लॅब) आज (नऊ ऑगस्ट) सुरू झाली. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

सिंधुदुर्गातील कलाकारांचा ‘वारी’ लघुपट यू-ट्यूबवर प्रदर्शित

कुडाळ : अत्यंत अभूतपूर्व परिस्थिती उद्भभवल्यामुळे यंदा प्रथमच वारीच्या परंपरेत खंड पडला आहे. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांच्या मनाला हुरहुर लागून राहिली आहे. या पार्श्वभूमीवर, सिंधुदुर्गातील कलाकारांनी एकत्र येऊन ‘वारी’ नावाचा लघुपट तयार केला आहे. ‘विद्यम् आर्टस्’तर्फे तयार करण्यात आलेला हा लघुपट आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर यू-ट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. एक वारकरी या लॉकडाउनमध्ये विठ्ठलाच्या ओढीने वारीला जायला निघतो; पण या प्रवासात त्याला कोणते अनुभव येतात, त्याचे चित्रण या लघुपटात करण्यात आले आहे. करोनाशी संबंधित सुरक्षिततेचे सर्व निकष पाळून हा लघुपट तयार करण्यात आला आहे.

ढ मंडळीने आयोजित केली ऑनलाइन नाट्यसंगीत स्पर्धा

कुडाळ : येथील ढ मंडळीने आगळीवेगळी ऑनलाइन नाट्यसंगीत स्पर्धा आयोजित केली आहे. करोना प्रतिबंधक लॉक डाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा उपयोग व्हावा, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

हाडाच्या कलाकारांनी लॉकडाऊनवर मात करतानाच मिळविली पारितोषिके

कुडाळ : ‘करोना’च्या संकटामुळे सर्वांनाच सध्या घरात थांबणे बंधनकारक झाले आहे. तरीही ‘हाडाचा कलाकार’ स्वस्थ बसू शकत नाही. त्यांच्या कलेच्या आविष्काराला व्यासपीठ मिळावे आणि ‘करोना’मुळे सतत घरी राहणे सुसह्य, सुखकारक व्हावे, यासाठी कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्स या संस्थेने ‘घरबसल्या जोपासू… वारसा कलेचा… ही एक आगळीवेगळी संकल्पना राबविली. त्यासाठी आयोजित केलेल्या स्पर्धेला महाराष्ट्र आणि गोव्यातून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यातील सहा जणांनी रोख पारितोषिकेही पटकावली आहेत.

वालावलची रामनवमी

या वर्षी करोना विषाणूच्या प्रभावामुळे आमच्या वालावल गावातील रामनवमीचा उत्सव हा सार्वजनिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी रद्द करण्यात आला आहे. हा उत्सव रद्द करताना मनातील ज्या भावनेवर दगड ठेवला गेला तो गावातील प्रत्येकाला स्वीकारताना जड जात आहे. या उत्सवाची मजा काही औरच असते. ती ज्याने अनुभवली तो आज नक्की चुकचुकत असणार यात तिळमात्रदेखील शंका नाही.