दर्पणकारांच्या पत्रकारितेचा वारसा जतन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, २० फेब्रुवारी रोजी त्यांना विनम्र अभिवादन केले. ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिलेला पत्रकारितेचा वसा आणि वारसा प्रय़त्नपूर्वक जतन करू या’, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

`दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव शासकीय अभिवादन यादीत समाविष्ट

मुंबई : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक `दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांच्या शासकीय अभिवादन यादीत नव्याने समाविष्ट केले आहे. त्यानुसार येत्या शनिवारी (२० फेब्रुवारी) बाळशास्त्री जांभेकर यांच्या २०९ व्या जयंतीदिनी शासकीय कार्यालयांमध्ये बाळशास्त्रींना अभिवादन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२५ डिसेंबरपासून ऑनलाइन रामकथा सप्ताह आणि प्रश्नमंजूषा स्पर्धा

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत बाल विभागातर्फे सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी रामकथांची मेजवानी ठरणारा ऑनलाइन रामकथा सप्ताह आणि प्रश्नमंजूषा स्पर्धा येत्या २५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

२२ डिसेंबरपासून राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी

मुंबई : ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी आज (२१ डिसेंबर) बैठक घेतली. राज्यात उद्यापासून (२२ डिसेंबर) महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पाच जानेवारी २०२१पर्यंत अशी संचारबंदी लागू राहील.

विनामास्क फिरणाऱ्या २५ टक्के लोकांमुळे समाजाला धोका : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील ७० ते ७५ टक्के लोक बाहेर फिरताना मास्क वापरताना दिसतात. उरलेले २५ टक्के लोक विनामास्क फिरत आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आणि समाजाला धोका होऊ शकतो, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.