२५ डिसेंबरपासून ऑनलाइन रामकथा सप्ताह आणि प्रश्नमंजूषा स्पर्धा

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत बाल विभागातर्फे सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी रामकथांची मेजवानी ठरणारा ऑनलाइन रामकथा सप्ताह आणि प्रश्नमंजूषा स्पर्धा येत्या २५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

श्रीरामाच्या जीवनातील गोष्टी खूपच रंजक आणि प्रेरणादायी असतात. त्या सांगण्यासाठी रामकथा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. रामजन्मापासून ते रावणाच्या वधापर्यंत रामायणाचा सर्व जीवनपट गोष्टींच्या रूपातून या सप्ताहात ऐकायला मिळणार आहे. या कथा २५ ते ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता सलग ७ दिवस सांगितल्या जातील. फेसबुक लाइव्ह आणि यूट्यूबवर त्या प्रसारित होतील. रामकृष्ण चिंचकर कथाकथन करतील. रोज ऐकलेल्या कथेवर आधारित एक प्रश्नमंजूषाही विद्यार्थ्यांना सोडवायला मिळणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना आणखी माहिती तर मिळेलच, पण ती एक स्पर्धाही असणार आहे.
रामकथा आणि प्रश्नमंजूषा यांच्या लिंक सोबत दिल्या आहेत. त्या लिंकवर सायंकाळी साडेसात वाजण्यापूर्वी क्लिक करून २५ डिसेंबर रोजी जॉइन करायचे आहे. तत्पूर्वी लिंकवर क्लिक करून पेज लाइक केल्यास त्याची नोटिफिकेशन्स मिळत राहणार आहेत.

त्यासाठी लिंक अशा – ● फेसबुक – http://www.facebook.com/SSSPMP
● यू-ट्यूब – https://tinyurl.com/SSSPMP

प्रश्नमंजूषेची लिंक रोज रात्री ९ ते दुसऱ्या दिवशी ६ वाजेपर्यंत चालू राहील. एकाच लिंकवरून रोजची प्रश्नमंजूषा सोडवायची आहे. त्यासाठी लिंक अशी – https://forms.gle/u4MgsBgWc6BtF3rQ9.

अधिकाधिक विद्यार्थ्यांनी रामकथा ऐकावी आणि स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply