करोनाचे रत्नागिरीत २१, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२२ डिसेंबर) करोनाचे २१ नवे रुग्ण आढळले, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ नव्या रुग्णांची नोंद झाली. रत्नागिरीत आठ जण, तर सिंधुदुर्गात आज २९ जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार १४ (रत्नागिरी ८, संगमेश्वर ५, राजापूर १) नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात सध्या १०४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात होम आयसोलेशनमध्ये असलेल्या ५२ जणांचा समावेश आहे, तर सर्वाधिक ३० रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ९०८६ झाली आहे. आज चाचणी घेतलेल्या आणखी १२५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत चाचणी घेतलेल्या ५८ हजार १७१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आज ८ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यांच्यासह आतापर्यंत एकूण आठ हजार ६०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. करोनामुक्तीचा हा दर ९४.७० टक्के आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण मृतांची संख्या ३२७ झाली असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६० टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे २४ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या पाच हजार ७८० झाली आहे. सध्या सक्रिय असलेले ३७४ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचारांखाली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या पाच हजार २४९ झाली आहे. आतापर्यंत १५१ जणांचा मृत्यू नोंदविला गेला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply