मुंबई : राज्यात आज, (१४ एप्रिल) रोजी रात्री ८ वाजल्यापासून १ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत काय सुरू राहील आणि काय बंद असेल, कुठल्या सेवा, आस्थापना सुरू असतील, कुठल्या बाबींसाठी सूट असेल आदींबाबतची माहिती राज्य शासनाच्या नियमावलीत देण्यात आली आहे.