बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मारकासाठी निधी जाहीर झाल्याने समाधान

सिंधुदुर्गनगरी : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे राज्यातील पहिले स्मारक बाळशास्त्री यांच्या जन्मगावी पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देणार असल्याचे आज जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले आहे. त्याबद्दल पोंभुर्ले येथे सर्वप्रथम स्मारक उभारणाऱ्या महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेने समाधान व्यक्त केले आहे.

पोंभुर्ले गावातील जांभे–देऊळवाडी ग्रामस्थ आणि पोंभुर्ले ग्रामपंचायतीच्या सहकार्याने २००४ साली बाळशास्त्रींचे स्माक उभारले आहे. या स्मारकाची दुरुस्ती आणि सुशोभीकरणाचा आराखडा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सादर केला. त्याअनुषंगाने उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या ५ जानेवारी रोजी त्यांच्या कार्यालयात विशेष बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये आश्वाषसन दिल्याप्रमाणे आज जाहीर झालेल्या राज्य अर्थसंकल्पात याबाबत आवश्यक तो निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संस्थेने मागणी केल्यानुसार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेसाठी आणखी दहा कोटी रुपये देण्याची अर्थसंकल्पीय तरतूदही आज जाहीर झाली. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या या दोन्ही मागण्यांची दखल उपमुख्यमंत्र्यांनी घेतल्याबद्दल संस्थेने त्यांचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. ही माहिती माहिती महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्व्स्त विजय मांडके, विश्वळस्त अमर शेंडे, रोहित वाकडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले (ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग) येथील स्मारकासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. स्वर्गीय शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या व्याजातून ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्तीवेतन देण्यात येते. त्यासाठी सध्या २५ कोटी रुपयांची ठेव असून त्यात १० कोटी रुपयांची भर जाहीर करत असल्याचे, अजितदादा पवार यांनी आज अर्थसंकल्प मांडताना जाहीर केले आहे. पोंभुर्ले येथील स्मारकाच्या दुरुस्तीचा आणि सुशोभीकरणाचा प्रकल्प पोंभुर्ले ग्रामपंचायत व जांभे ग्रामस्थ आणि स्मारकासाठी मदत करणारे पत्रकार व हितचिंतक यांच्या सहकार्याने पूर्ण केला जाईल.

सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या सहकार्याने तसेच खासदार विनायक राऊत यांच्या मदतीने पोंभुर्ले येथील केवळ स्मारकच नव्हे तर संपूर्ण पोंभुर्ले गाव पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील आदर्श गाव करण्यासाठी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी पुढाकार घेणार आहे, अशीही माहिती श्री. बेडकीहाळ यांनी दिली. पोंभुर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सादिक डोंगरकर, अॅ्ड. प्रसाद करंदीकर, ज्येष्ठ नेते शांताराम गुरव, जांभे-देऊळवाडीचे सर्व ग्रामस्थ, युवक यांनी जांभेकर स्मारकासाठी अर्थसंकल्पातील तरतुदीबाबत समाधान व्यक्त केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply