झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय दहावा – भाग ५

खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..

झोंपाळ्यावरची गीता – अध्याय दहावा : विभूतियोग

सर्वांच्या हृदयीं। आत्मा जो वसतो ।।
मीच बा असें तो । निश्‍चयानें ।।१७।।

विष्णु मीच स्वयें । बारा आदित्यांत ।।
तेजोवलयांत । सूर्य मीच ।।१८।।

नक्षत्रीं मी चंद्र । साम मी वेदांत ।।
देव समूहांत । इंद्र मीच ।।१९।।

वाणींत ॐकार । इंद्रियांत मन ।।
प्राण्यांत चैतन्य । मीच असें ।।२०।।

Chapter 10 – The Divine Grace

I am the beatings । Of hearts of all beings ।
Of all living beings । I am the soul ।।17।।

I am the brightest । Celestial Sun ।
I am Lord Vishnu । And glory of heaven ।।18।।

The moon among planets । And hymns in the Vedas ।
Indra, too I am । Among heavenly Gods ।।19।।

Mind amidst organs । Spirit of animals ।
Power of parlance । I am instead ।।20।।

(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)

……..

श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथ दशमोऽध्यायः । विभूतियोगः

श्रीभगवानुवाच ।

अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।
अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥१०-२०॥

आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् ।
मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥१०-२१॥

वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः ।
इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥१०-२२॥

(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply