रत्नागिरी, सिंधुदुर्गात प्रत्येकी १७ जण करोनामुक्त

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (८ मार्च) करोनाचे नवे ७ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहा हजार ११८ झाली आहे. आज १७ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात नवे १ बाधित रुग्ण आढळला, तर १७ जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे ७ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत २, तर खेड, गुहागर, चिपळूण आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी १ बाधित रुग्ण आढळला. रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी तालुक्यात १ रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून ७). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार ११८ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ३६७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ८४ हजार ७१६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १६६ आहे. त्यातील सर्वाधिक ५७ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ६४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १७ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९५६६ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.५४ टक्के आहे.

जिल्ह्यात आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. खेड तालुक्यातील ६८ वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३६८ असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६३ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सिंधुदुर्गात आज (८ मार्च) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, आज अवघा एक नवा करोनाबाधित रुग्ण आढळला, तर १७ रुग्ण करोनामुक्त झाले. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६५१२ झाली आहे. आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ६१७० झाली आहे. सध्या जिल्ह्यात १७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सांगवे (ता. कणकवली) येथील ५२ वर्षीय पुरुषाचा आज मृत्यू झाला. त्याला मधुमेह आणि मूत्रपिंडाचा विकार होता. त्याच्यासह जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७५ झाली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply