भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रत्नागिरीतील श्रीकांत ढालकर यांनी लिहिलेलं आणि सादर केलेलं हे गीत… (व्हिडिओ शेवटी दिला आहे.)
हृदयी बाबा तुमची ज्योत पंचशील तत्त्व अमर हे सूत्र ।
रत्न भारत, भूषण भारत, जय भीम प्रेरणा, उजळे आकाश ।।धृ.।।।
भाग्यवान आम्ही, डोळा भरून पाही
दीपस्तंभ या संसारी, आजही पाही
जगाच्या कल्याणा, महान विभूती
सावली समावली, माय माऊली ती ।।१।।
करुणासागरा, मानव उद्धारा,
भेदाभेद तोडून, हित जपणारा
मुकुटमणी तू जगी या झाला
आधार होऊनी विचार ठेविला ।।२।।
समता कल्याणाची, घटना लिहिली,
तूच रे साथी, कष्टही साहिली
अन्यायाला न्याय, देशाभिमान,
केलेत दुर्बला ज्ञानी बलवान ।।३।।
- श्रीकांत ढालकर, रत्नागिरी
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड