मोठा गाजावाजा होऊन जी ट्वेंटी शिखर परिषदेची पहिली बैठक मुंबईत पार पडली. मुंबईसह महाराष्ट्राची औद्योगिक तसेच पर्यटनदृष्ट्या भरभराट यावी, यासाठी या परिषदेत प्रयत्न केले जाणार आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील सह्याद्री पर्वतासह विविध ठिकाणांचा उल्लेख झाला, पण त्यात महाराष्ट्राचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणाचा साधा उल्लेखही झाला नाही.
