परशुराम घाट २४ तास खुला, मेगाब्लॉक बंद

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील दररोज दुपारचा मेगाब्लॉक बंद करण्यात आला असून आजपासून घाटातून २४ तास वाहतूक सुरू झाली आहे.

परशुराम घाटातील मेगाब्लॉकच्या वेळेत बदल

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी २५ एप्रिल ते २५ मे या कालावधीत बंद राहणार आहे. त्या मेगाब्लॉकच्या वेळेत बदल झाला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या २ मे रोजीच्या पत्रकात म्हटले आहे.

परशुराम घाटातील मेगाब्लॉकच्या काळात वापरासाठी पर्यायी रस्ते निश्चित

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी येत्या २५ एप्रिल ते २५ मे या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. याबद्दलचा आदेश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आज (२३ एप्रिल) जाहीर केला. या काळात वाहतुकीसाठी पर्यायी रस्तेही निश्चित करण्यात आले आहेत.

परशुराम घाटातील मेगाब्लॉक २५ एप्रिल ते २५ मेपर्यंत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी येत्या २५ एप्रिल ते २५ मे या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. यापूर्वी २० एप्रिलपासून पाच तास घाट बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर झाला होता. आजच्या बैठकीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ असे तास घाट बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

परशुराम घाटात २० एप्रिलपासून दररोज दुपारी ५ तास मेगाब्लॉक

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटातील वाहतूक येत्या २० एप्रिलपासून घाटाची दुरुस्ती होईपर्यंत दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.