रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी येत्या २५ एप्रिल ते २५ मे या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. याबद्दलचा आदेश रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आज (२३ एप्रिल) जाहीर केला. या काळात वाहतुकीसाठी पर्यायी रस्तेही निश्चित करण्यात आले आहेत.
मेगाब्लॉकच्या काळात अवजड वाहनांची वाहतूक मुंबई-पुणे मार्गे आणि चिपळूण-कराड मार्गे वळविली जाणार आहे. तसेच, अवजड वगळता अन्य सर्व कमी वजनाच्या वाहनांची वाहतूक आंबडस-चिरणी-लोटे रस्ता आणि कळंबस्ते-आंबडस-धामणंद या रस्त्याने वळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या वाहतुकीच्या अनुषंगाने या पर्यायी रस्त्यांच्या डागडुजीचे आदेशही देण्यात आले आहेत. आवश्यक त्या सूचना संबंधित रस्त्यांवरही लावण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.
कमी वजनाच्या वाहनांसाठीच्या पर्यायी मार्गाचा गुगल मॅप, तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश सोबत देत आहोत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड