गणेशोत्सवासाठी रत्नागिरीतून सिंधुदुर्गात जाऊ इच्छिणाऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधाचा उद्देश कायम ठेवून गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या आठ ते १५ दिवसांच्या वास्तव्याबाबत शासनाने स्पष्ट निर्णय घेण्याची आणि नियोजन करण्याची चाकरमान्यांनी मागणी केल्यानंतर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली; मात्र चाकरमान्यांचे विलगीकरण १४ दिवसांचे होणार की सात दिवसांचे, संस्थात्मक की गृह विलगीकरण याबाबत अद्यापही शासन आणि प्रशासनाने काहीही स्पष्ट केलेले नाही. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग या आपल्या मूळ जिल्ह्यात उत्सवासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांबाबतचा कोणताच विषय पुढे आलेला नाही.

Continue reading

कोकण रेल्वेचे कर्मचारी करोना प्रतिबंधक विलगीकरणामध्ये

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या बेलापूर या मुख्य कार्यालयातील सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा दोन दिवसांपूर्वी करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या रोहा, कोलाड आणि रत्नागिरीतील सुमारे तीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

Continue reading

आठ मार्चनंतर पुण्या-मुंबईतून रत्नागिरीत आलेल्यांनी सक्तीने घरीच राहावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रत्नागिरी : मुंबई व पुणे शहरातून आठ मार्च २०२०नंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेल्या व्यक्तींनी राहत्या ठिकाणातून/घरातून बाहेर पडू नये, असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Continue reading

क्वारंटाइन म्हणजे काय रे भाऊ?

कोरोना या विषाणूची साथ आल्यापासून पॅन्डेमिक, इन्क्युबेशन पीरियड, आयसोलेशन, क्वारंटाइन हे शब्द वारंवार ऐकू येत आहेत. या ‘मेडिकल टर्म्स’मुळे सामान्य माणूस गोंधळून गेला आहे. विशेषतः क्वारंटाइन हा शब्द दहशतीसारखा वाटतो आहे; पण कुठलीही साथ आटोक्यात आणण्याकरिता क्वारंटाइनसारखा उत्तम पर्याय नाही याबद्दल दुमत नाही. या शब्दामागची भिती, दहशत कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट करणारा, बाल आरोग्य संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर दाभाडकर (महाड) यांनी लिहिलेला हा लेख…

Continue reading