स्वरसिंधुरत्न पुरस्कारांचे थाटात वितरण

वालावल : डॉ. अशोक प्रभू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या स्वरसिंधुरत्न शास्त्रीय गायन स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कारांचे विशेष सोहळ्यात वितरण करण्यात आले. वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर (२९ जून २०२३) या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आदिपंढरी वालावलच्या नारायणाची माळ पंढरपूरच्या विठोबाच्या गळ्यात

वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील लक्ष्मीनारायणाच्या अंगावरील वस्त्र आणि तुळशीच्या मंजिऱ्यांची माळ घातल्यानंतरच महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाचा आषाढी एकादशीचा उत्सव सुरू होतो. या लक्ष्मीनारायणाचे मंदिर असलेल्या वालावल गावाला म्हणूनच ‘आदिपंढरी’ म्हणून ओळखले जाते. या मंदिरात आषाढी एकादशीला होणारा उत्सव यंदा करोनामुळे मोजक्या उपस्थितीत होत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने, हे मंदिर आणि उत्सवाची माहिती देणारा लेख…

अ. भा. दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या युवाप्रमुखपदी विशाल कडणे

तळेरे (कणकवली) : तळेरे गावचे सुपुत्र, गृहनिर्माण चळवळीतील युवा नेतृत्व आणि मुंबई हाउसिंग फेडरेशनचे संचालक डॉ. विशाल कडणे यांची अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या युवाप्रमुखपदी एकमताने निवड करण्यात आली.

माधव कदम यांना बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार

पोंभुर्ले (ता. देवगड) : यावर्षीचा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘जीवन गौरव पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना जाहीर करण्यात आला आहे.

मदर्स डेनिमित्ताने ‘श्रीरंग’तर्फे माय-लेकींचा कौतुक सोहळा

वालावल (ता. कुडाळ) : राज्यातील अंध, दिव्यांग, अॅसिड व्हिक्टिमसहित विविध वंचित घटकांसोबत काम करणाऱ्या श्रीरंग फाउंडेशनने ‘मदर्स डे’च्या निमित्ताने मायलेकींच्या कौतुकाचा सोहळा साजरा केला. वालावल (ता. कुडाळ) येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरात हा सोहळा साजरा झाला.

बाळशास्त्री जांभेकर यांना पुण्यतिथीनिमित्ताने कविसंमेलनातून अभिवादन

देवगड : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १७७ व्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी पोंभुर्ले (ता. देवगड) येथे येत्या १७ मे रोजी कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.