नुसतेच बुडबुडे नकोत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच कोकणात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यापाठोपाठ ते रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत. बऱ्याच काळानंतर मुख्यमंत्री रत्नागिरीत येणार असल्यामुळे त्याबद्दलचे कुतूहल आहेच, पण आधीच्या घोषणेला पूरक अशी उद्योजकतेच्या दृष्टीने कोणती नेमकी घोषणा ते करणार आहेत, याबाबतची उत्सुकता आहे.

माणगावचे श्री दत्त मंदिर

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील माणगाव हे आता दत्तस्थान म्हणून नावारूपाला आले आहे. श्री टेंब्ये स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तमंदिराविषयीचा हा लेख……..

अवधूत संप्रदाय : सद्गुरू दत्तभक्तीचा सुंदर आविष्कार

आज मार्गशीर्ष शुद्ध १४, बुधवार दिनांक ७ डिसेंबर २०२२ म्हणजेच श्रीदत्त जयंती. त्यानिमित्ताने बाळेकुंद्री (कर्नाटक) येथील अवधूत संप्रदायाविषयी विशेष लेख. सोबत माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी यांनी स्थापन केलेल्या दत्तमंदिरातील उत्सवाची क्षणचित्रे.

झोंपाळ्यावरची गीता : जशी आहे तशी

राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी झोंपाळ्यावरच्या गीतेचा केलेला समश्लोकी इंग्रजी अनुवाद गीता जयंतीच्या मुहूर्तावर प्रसिद्ध होत आहे.

बोरिवलीत शनिवारी गीत गीतामृताचा अनोखा कार्यक्रम

मुंबई : येत्या शनिवारी (दि. ३ डिसेंबर) गीता जयंतीच्या निमित्ताने गीत गीतामृत हा सांगीतिक कार्यक्रम बोरिवली येथे होणार आहे.

रापण : कोकण किनारपट्टीचे सांस्कृतिक लेणे

सागराचे सान्निध्य लाभल्याने उकडा भात आणि माशाचे कालवण ही कोकणी माणसाची स्वर्गीय सुखाची थाळी. मग माशांचा प्रकार काहीही असो, कोकणी माणूस प्रत्येकाच्या आगळ्यावेगळ्या चवीला मानाचा मुजरा करून यथेच्छ उदरभरण करीत असतो. अर्थात मासे उड्या मारत ताटात कधीच येत नसतात. ते पकडण्यासाठी अनेक प्रकार आहेत. त्यात रापणीची मासेमारी म्हणजे एक संस्थानच! त्याचा रुबाब, त्याची अदब, सारेच आगळे आणि वेगळे! अलीकडे रापणीची ही संस्कृती कोकणच्या किनाऱ्यावरून अस्तंगत होत आहे. म्हणूनच या संस्कृतीच्या वेगळेपणापासून अर्थकारणापर्यंत आणि गीतांपासून नियमांपर्यंत अशा सर्व बाजूंची ओळख करून देणारा हा लेख… सुरेश ठाकूर यांच्या लेखणीतून…