सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या रांगोळी स्पर्धेत प्राची सावंत आणि चित्रकला स्पर्धेत यश शिंदे प्रथम

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये रांगोळी स्पर्धेत पाचवी ते सातवीच्या गटात जिल्हा परिषदेच्या पावशी-मिटक्याचीवाडी येथील शाळेच्या प्राची सदानंद सावंत हिने पहिला क्रमांक पटकावला आहे. रांगोळी स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवीच्या गटात वाडोस नं. १ शाळेचा विद्यार्थी यश मधुकर शिंदे याला पहिला क्रमांक मिळाला आहे.

पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा ‘कोमसाप-मालवण’तर्फे अक्षरगौरव

यंदा पद्मश्री पुरस्काराने गौरव झालेले पिंगुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील लोककलावंत परशुराम गंगावणे यांची भेट घेऊन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेच्या कार्यकारिणीने नुकताच त्यांचा गौरव केला.

जाणिवेचा अनोखा सरित्सागर संगम

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने प्रसिद्ध केलेल्या आणि रत्नागिरीतील सत्त्वश्री प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ या पुस्तकाची गझलभूषण मधुसूदन नानिवडेकर यांनी लिहिलेली प्रस्तावना.

नानिवडेकर, हरकत होतीच पण ऐकला नाहीत!

गझलभूषण मधुसूदन नानिवडेकर यांचे ११ जुलै २०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी जागविलेल्या आठवणी.

अ. भा. गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन

तळेरे (ता. कणकवली) : अखिल भारतीय गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध गझलकार आणि पत्रकार मधुसूदन नानिवडेकर (वय ६१) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनाने राज्यातील साहित्यिक वर्तुळात तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.

सिंधुसाहित्यसरिता पुस्तकाला जिल्हा परिषद शाळेत मान्यता

मालवण : रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या येथील शाखेने संपादित केलेल्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ पुस्तकाच्या खरेदीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना खरेदीसाठी मान्यता देण्यात आली आहे.