सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या रांगोळी स्पर्धेत प्राची सावंत आणि चित्रकला स्पर्धेत यश शिंदे प्रथम

सिंधुदुर्गनगरी : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये रांगोळी स्पर्धेत पाचवी ते सातवीच्या गटात जिल्हा परिषदेच्या पावशी-मिटक्याचीवाडी येथील शाळेच्या प्राची सदानंद सावंत हिने पहिला क्रमांक पटकावला आहे. रांगोळी स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवीच्या गटात वाडोस नं. १ शाळेचा विद्यार्थी यश मधुकर शिंदे याला पहिला क्रमांक मिळाला आहे. जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व, निबंधलेखन या स्पर्धांमधले विजयी विद्यार्थी व शिक्षक यांचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, आरोग्य सभापती अनिषा दळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख यांनी अभिनंदन केले आहे.

२८ व २९ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हा पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये तालुका स्तरावरच्या पहिल्या तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धांचे निकाल आज (३० डिसेंबर) जाहीर करण्यात आले. एकूण तीन गटांमध्ये घेण्यात आलेल्या या विविध स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे आहेत.

रांगोळी स्पर्धा – ५ वी ते ७ वी गट
प्रथम क्रमांक – प्राची सदानंद सावंत, जि. प. शाळा, पावशी, मिटक्याचीवाडी, कुडाळ
द्वितीय क्रमांक – जागृती योगेश पांचाळ, जि. प. शाळा, सांगुळवाडी नं. १, वैभववाडी
तृतीय क्रमांक – भार्गवी घनश्याम आळवे, जि. प. शाळा, झाराप-कामळेवीर, कुडाळ

८ वी ते १० गट
प्रथम क्रमांक – पूर्वा रामदास चांदरकर, माध्यमिक विद्यालय, नेमळे, सावंतवाडी
द्वितीय क्रमांक – मनीष रवींद्र मेस्त्री, कलेश्वर हायस्कूल, नेरूर, कुडाळ
तृतीय क्रमांक – मंथन संजय सुतार, रेकोबा माध्यमिक विद्यालय, वायरी, मालवण.

११ वी ते १२ वी गट
प्रथम क्रमांक – मितेश राजेंद्र पाताडे, माध्यमिक विद्यालय कनेडी, कणकवली
द्वितीय क्रमांक – प्रसाद राजाभाऊ खोरगाडे, आर. पी. डी. हायस्कूल, सावंतवाडी
तृतीय क्रमांक – गौरेश शशिकांत राऊळ, खेमराज ज्यु. कॉलेज, बांदा, सावंतवाडी

चित्रकला स्पर्धा – ५ वी ते ७ वी गट
प्रथम क्रमांक – यश मधुकर शिंदे, जि. प. शाळा वाडोस नं. १, कुडाळ
द्वितीय क्रमांक – आर्यन सुनील पवार, विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली
तृतीय क्रमांक – आदर्श नंदकुमार चव्हाण, जि. प. शाळा कुसुंबे नं. १, कुडाळ

८ वी ते १० वी गट
प्रथम – सर्वेश मधुसूदन खांबल, दोडामार्ग हायस्कूल, दोडामार्ग
द्वितीय – श्रावणी दिनेश मेस्त्री, जांभवडे हायस्कूल, जांभवडे, कुडाळ
तृतीय – तन्मय संजय मुळीक, माध्यमिक विद्यालय, शिवडाव, कणकवली

११ वी ते १२ वी गट
प्रथम – प्रसाद सुहास कदम, शिरगाव ज्यु. कॉलेज शिरगाव, देवगड
द्वितीय – शेजल महादेव कुबल, दोडामार्ग ज्यु. कॉलेज, दोडामार्ग
तृतीय – ओंकार वसंत हळदणकर, पाट ज्यु. कॉलेज, पाट, कुडाळ

निबंध स्पर्धा – गट ५ वी ते ७ वी
प्रथम – श्रेया प्रेमनाथ मांजरेकर, जि. प. शाळा झाराप-कामळेवीर, कुडाळ
द्वितीय – चिन्मयी जयसिंग खानोलकर, जि. प. शाळा, दोडामार्ग नं. १, दोडामार्ग
तृतीय – प्रथमेश औदुंबर तळेकर, जि. प. शाळा, कुंभवडे नं. १, वैभववाडी

गट ८ वी ते १० वी
प्रथम – सुहानी सुगंध मोंडकर, पाट हायस्कूल, पाट, कुडाळ
द्वितीय – सोनिया गजानन गवंडळकर, भेडशी हायस्कूल, भेडशी, दोडामार्ग
तृतीय – यशश्री चंद्रकांत केरकर, अणसूर पाल हायस्कूल, अणसूर, वेंगुर्ला

गट – ११ वी ते १२ वी
प्रथम – लक्ष्मी दत्ताराम पारकर, कनिष्ठ महाविद्यालय, आचरा, मालवण
द्वितीय – ईशा सुधीर पराडकर, कनिष्ठ महाविद्यालय, आचरा, मालवण
तृतीय – निष्ठा दिलीप गवंडी, गुरुवर्य अ. वि. बावडेकर विद्यालय व ज्युनियर कॉलेज, शिरोडा, वेंगुर्ला

वक्तृत्व स्पर्धा – गट ५ वी ते ७ वी
प्रथम – मैथिली अनंत हुंबळे, जि. प. शाळा आंबोली, नागरतास, सावंतवाडी
द्वितीय – इमाद अन्वर कुरवले, जि. प. शाळा विजयदुर्ग (उर्दू), देवगड
तृतीय ध्रुवी महेश भाट, वराडकर हायस्कूल, कट्टा, मालवण

गट ८ वी ते १० वी
प्रथम – श्रेयस श्रीकांत गवस, पिकुळे हायस्कूल, पिकुळे, दोडामार्ग
द्वितीय – श्रद्धा सत्यवान मडव, जांभवडे हायस्कूल, जांभवडे, कुडाळ
तृतीय – दुर्गा नंदकुमार मुणगेकर, नाथ पै ज्ञान प्रबोधिनी, करुळ, ता. कणकवली

गट ११ वी ते १२ वी
प्रथम – सिद्धी शशिकांत सावंत, ज्यु. कॉलेज, बांदा, सावंतवाडी
द्वितीय – रिद्धी मनोज ओगले, पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड
तृतीय – संस्कृती विजय हरकूळकर, कणकवली कॉलेज, कणकवली

फक्त शिक्षकांसाठीच्या देशभक्तिपर गीतलेखन व गायन स्पर्धा
गट – प्राथमिक शिक्षक
प्रथम – सचिन लक्ष्मण जाधव, जि. प, शाळा, देवगड सडा, देवगड
द्वितीय – सखाराम राघो गुरव, जि. प. शाळा, हिर्लोक नं. १, कुडाळ
तृतीय – योगेश सुधाकर सकपाळ, जि. प. शाळा म्हापण, खवणेश्वर, वेंगुर्ला

गट – माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक
प्रथम – स्वप्नील श्रीकृष्ण गोरे, मिलाग्रिस हायस्कूल, सावंतवाडी
द्वितीय – प्रसाद गजानन शेवडे, शेठ म. ग. हायस्कूल, देवगड
तृतीय – नितीन लक्ष्मीकांत धामापूरकर, नेमळे हायस्कूल, नेमळे, सावंतवाडी

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply