रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांच्या संख्येतील वाढ सुरूच; १३ नवे रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (३० डिसेंबर) सलग दुसऱ्या दिवशी करोनाच्या नव्या बाधितांमध्ये वाढ झाली आहे. आज नवे १३ रुग्ण आढळले, तर ६ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय करोनाबाधितांची संख्या वाढून ४८ झाली आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार १८३ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ६४५ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी घटून ९६.७९ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ४९१ पैकी ४८५ नमुने निगेटिव्ह, तर ६ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ४१३ पैकी ४०६ नमुने निगेटिव्ह, ७ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ६० हजार ४२१ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ४८ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ३०, तर लक्षणे असलेले १८ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ३०, तर संस्थात्मक विलगीकरणात १८ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ८, तर डीसीएचमध्ये १० रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी १ रुग्ण ऑक्सिजनवर आहे, तर २ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४९० एवढीच कायम आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.१ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४७९, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८२९, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४९०).

लसीकरणाची स्थिती

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तपशिलानुसार काल (दि. २९ डिसेंबर) झालेल्या करोनाप्रतिबंधक लसीकरणाच्या ८२ सत्रांत १२६८ जणांनी पहिला, तर ९६१८ जणांनी दुसरा डोस घेतला. कालपर्यंत जिल्ह्यातील १० लाख ८ हजार २०७ जणांचा पहिला, तर ६ लाख ५८ हजार ७१६ जणांचे दोन्ही डोसेस घेऊन झाले आहेत. एकूण १६ लाख ६६ हजार ९२३ जणांचे लसीकरण जिल्ह्यात पार पडले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply