सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचा एकमेव बाधित रुग्ण आढळला, तर ३ रुग्ण करोनामुक्त झाले.
प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार आज (२९ डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या १२ असून आतापर्यंत ५१ हजार ७५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ५३ हजार २३२ रुग्ण बाधित आढळले, तर आतापर्यंत १ हजार ४६४ रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात आज आढळलेला रुग्ण देवगड तालुक्यातील आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ४, दोडामार्ग २, कणकवली २, कुडाळ २, मालवण १, सावंतवाडी १, वैभववाडी ०, वेंगुर्ले ०, जिल्ह्याबाहेरील ०.
एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली नसल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४६४ एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४४, कणकवली – ३००, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०७, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड