pexels-photo-4031867.jpeg

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार नवे करोनाबाधित

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे चार नवे रुग्ण आढळले, तर एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही.

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार आज (३० डिसेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या करोनाविषयक अहवालानुसार जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या दोन रुग्णांचा, तर जिल्ह्यातील लॅबमधील दोन अशा चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या १६ झाली असून, आतापर्यंत ५१ हजार ७५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ५३ हजार २३६ रुग्ण बाधित आढळले, तर आतापर्यंत १४६४ रुग्णांचा मृत्यू झाला.

आज दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात प्रत्येकी एक, तर सावंतवाडी तालुक्यात दोन नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ४, दोडामार्ग ३, कणकवली २, कुडाळ २, मालवण १, सावंतवाडी ३, वैभववाडी ०, वेंगुर्ले १, जिल्ह्याबाहेरील ०.

एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद आज झाली नसल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४६४ एवढीच आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४४, कणकवली – ३००, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०७, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply