एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट; वेतनवाढीतील फरक वेतनासोबत देणार : एकनाथ शिंदे

एसटीचे सुमारे ८५ हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा, तसेच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (१३ ऑक्टोबर २०२५) मुंबईत जाहीर केला.

एसटीच्या रत्नागिरी विभागात ४३४ पदांची भरती; सप्टेंबरअखेरपर्यंत मुदत

राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या रत्नागिरी विभागामध्ये शिकाऊ उमेदवार भरतीकरिता विविध कार्यशाळा व्यवसायांतर्गत ४३४ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.

आता वाहनाची पीयूसी नसेल, तर पेट्रोल/डिझेल मिळणार नाही : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

गणेशोत्सवाकरिता एसटीच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

यंदा गौरी गणपती-उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी-प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

एसटीचे खासगीकरण कदापि नाही; प्रताप सरनाईक यांची ग्वाही; खासगी स्वच्छता संस्था नेमणार

‘राज्य शासनाचा अंगीकृत सार्वजनिक उपक्रम असलेली असलेली एसटी ही सुमारे ८३ हजार कर्मचाऱ्यांची मातृसंस्था आहे. भविष्यात एसटीचे कदापि खासगीकरण होणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असे नि: संदिग्ध प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज (१४ जुलै) केले.

एसटीने पावणेदहा लाख भाविकांना घडवले विठ्ठल दर्शन

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त ५२०० जादा बसेसच्या माध्यमातून एसटीने तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक-प्रवाशांची सुरक्षित ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडवले आहे.