एसटीच्या रत्नागिरी विभागात ४३४ पदांची भरती; सप्टेंबरअखेरपर्यंत मुदत

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या रत्नागिरी विभागामध्ये शिकाऊ उमेदवार भरतीकरिता विविध कार्यशाळा व्यवसायांतर्गत ४३४ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. https://apprenticeshipindia.org/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन अर्ज राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभाग कार्यालयात ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करावेत, असे राज्य परिवहन महामंडळाचे रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी कळवले आहे.
या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज व राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी या कार्यालयाकडे उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन नमुना अर्ज असे दोन्ही प्रकारचे अर्ज विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण कालावधी एका वर्षाचा असेल. भरती प्रक्रिया स्थगित करणे, रद्द करणे, तिच्यात अंशतः बदल करणे, भरावयाच्या जागांमध्ये वाढ किंवा घट करणे इत्यादींबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार विभाग नियंत्रकांना राहील
शिकाऊ उमेदवार भरतीकरिता विविध कार्यशाळा व्यवसायांतर्गत रिक्त पदे पुढीलप्रमाणे – यांत्रिक डिझेल ११०, यांत्रिक मोटारगाडी ११०, वीजतंत्री ६०, पत्राकारागीर ४४, सांधाता २५, कातारी १०, यंत्र कारागीर १०, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग ५, साठा जोडारी ४४, सुतार ४, रंगारी १०, शिवणकाम २.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply