राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी येथील मुख्य बसस्थानकाच्या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आज सायंकाळी (११ मे) राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम, रोजगार हमी योजनामंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत पार पडला. १९५८ साली उभारलेल्या या बसस्थानकाच्या नूतनीकरणाचं काम २०१४पासून विविध कारणांमुळे रखडलं होतं; मात्र उद्योगमंत्री सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या निधीतून दीड वर्षापूर्वी नवं बसस्थानक उभारण्याचं काम सुरू झालं आणि आज त्याचं लोकार्पण झालं.