पर्यटनवाढीसाठी शासकीय पाठबळ आवश्यक – रमेश कीर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाच्या वाढीसाठी अनेक पायाभूत सुविधांची गरज असून त्यासाठी शासकीय पाठबळ आवश्यक आहे, असे प्रतिपादन रत्नागिरीतील हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष आणि उद्योजक रमेश कीर यांनी केले.

रत्नागिरीत २५ जानेवारीला ग्रामीण आणि समुदाय आधारित पर्यटन परिषद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने येत्या २५ जानेवारीला ग्रामीण पर्यटन आणि समुदाय आधारित पर्यटन या विषयावर सलग चौथ्या वर्षी पर्यटन परिषद आयोजित केली आहे.

पर्यटक कोकणात राहण्यासाठी यावेत यासाठी प्रयत्न : अनिल परब

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येणारे पर्यटक दोन-चार दिवसांसाठी राहिले, तर जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार मिळेल. तसेच पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, हे लक्षात घेऊन पर्यटन धोरण आखले जाईल, अशी ग्वाही रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली. रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने आयोजित केलेल्या वारसा पर्यटन या विषयावरील तिसऱ्या शाश्वत पर्यटन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

रत्नागिरीत बुधवारी तिसरी शाश्वत पर्यटन परिषद

रत्नागिरी : रत्नागिरीच्या अंबर मंगल कार्यालयात बुधवारी (२७ जानेवारी) तिसरी शाश्वत पर्यटन परिषद होणार आहे. पालकमंत्री, खासदार, आमदार आणि तज्ज्ञ यावेळी उपस्थित राहणार आहेत. कोकणातील पर्यटनवाढीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांनी परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरीत २७ जानेवारीला तिसरी शाश्वत पर्यटन परिषद

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढण्यासाठी सलग तिसऱ्या वर्षी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे पर्यटन परिषद आयोजित केली आहे. येत्या २७ जानेवारीला अंबर मंगल कार्यालयात ही परिषद होईल, अशी माहिती रत्नागिरी पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली.