मोडीदर्पण दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

मुंबई : शिवकालीन मोडी लिपीच्या प्रसाराचे काम करणाऱ्या मोडी लिपी मित्र मंडळाच्या ‘मोडीदर्पण’ या चौदाव्या दिवाळी अंकाचे पवई येथे थाटात प्रकाशन झाले.

पर्यटनात लांज्याला मानाचे स्थान मिळवून देऊ या : विजय हटकर

लांजा : कोकणातील निसर्गरम्य लांजा तालुका वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांनी समृद्ध असून कोकण पर्यटनात लांज्याला मानाचे स्थान मिळवून देऊ या, असे आवाहन कोकण पर्यटन अभ्यासक आणि रत्नसिंधु टुरिझमचे संचालक प्रा. विजय हटकर यांनी येथे केले.

‘ग्रामविकासाचा रथ उत्तम प्रकारे हाकणारे सुधाभाऊ पेडणेकर आदर्शवत’

लांजा शहरातील नवोदित लेखक, पर्यटन अभ्यासक विजय हटकर यांनी लिहिलेल्या “जनसेवक सुधाभाऊ” या पुस्तकाचे श्री. गंगावणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

‘‘मोडीदर्पण’मुळे घडतील मोडी लिपीचे नवे अभ्यासक’

मुंबई : ‘विस्मृतीत गेलेल्या मोडी लिपीला गतवैभव प्राप्त करून देण्यामध्ये आणि नवे मोडी अभ्यासक घडविण्यासाठी मोडीदर्पण दिवाळी अंक महत्त्वाची भूमिका बजावेल,’ असे प्रशंसोद्गार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोडीदर्पण दिवाळी अंकाच्या प्रकाशनप्रसंगी काढले.