रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने सायकल रॅली काढून केले सावरकरांना अभिवादन

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी (२६ फेब्रुवारी) रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे लक्ष्मी चौक येथील वीर सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिरगाव गायवाडी येथे वीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि दामले कुटुंबाने १०० वर्षे जतन करून ठेवलेल्या खोलीला भेट देण्यात आली. या दोन्ही उपक्रमांमध्ये क्लबमधील सायकलस्वार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बुधवारी ‘सागरा प्राण तळमळला’, गुरुवारी कवी कुसमाग्रज जयंती

रत्नागिरी : महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी भाषा समिती आणि रत्नागिरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत दोन दिवसांचा कार्यक्रम रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे.

‘सर्व हिंदू धर्मीयांनी एकत्र येऊन देशसेवा करणे गरजेचे’

दानशूर भक्तिभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या ८१व्या पुण्यतिथीनिमित्त आज (२४ फेब्रुवारी) रत्नागिरीत विशेष रॅली, सहभोजन आणि सहभजन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

महाआरती करून स्वा. सावरकरांना अभिवादन

रत्नागिरी : स्वा. वि. दा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (दि. २६ फेब्रुवारी) त्यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने महाआरती करून अभिवादन करण्यात आले.

पतितपावन मंदिर हे सावरकर आणि भागोजीशेठ कीर यांच्या मैत्रीचे प्रतीक : नवीनचंद्र बांदिवडेकर

‘पतितपावन मंदिर हे भक्तिभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मैत्रीचे प्रतीक आहे. भागोजीशेठ कीर यांच्याकडे जातीय भेदभावापलीकडची मानवतेची दूरदृष्टी होती.

सडामिऱ्या येथे वीर सावरकरांचा स्मृतीस्तंभ उभारण्याची मागणी

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सडामिऱ्या (ता. रत्नागिरी) येथील ऐतिहासिक स्थळाचे संवर्धन करण्याबाबत रत्नागिरीकरांच्या वतीने पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.