सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे महिला सीएंचा हृद्य सत्कार

रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरीतील महिला सीएंचा हृद्य सत्कार सत्कार करण्यात आला. शाखेचे अध्यक्ष सीए बिपीन शहा, माजी अध्यक्ष सीए भूषण मुळ्ये यांच्या हस्ते पुष्परोपटे देऊन सन्मान करण्यात आला.

कला निंबरे, अभिलाषा मुळ्ये, शमिका सरपोतदार, अनुष्का हळबे, अमृता बेर्डे, मोनाली कुलकर्णी, मीनल काळे, दीपाली पाध्ये, आयेशा अघाडी, गायत्री पाटकर, नयन सुर्वे या सीएंचा सन्मान या वेळी करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुण्या व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ज्येष्ठ शिक्षिका सोनिया शिर्के, सीए कार्यालयातील चैत्राली करंजवकर आणि सौ. अघाडी यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष सीए आनंद पंडित यांनी केले.

मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष शहा म्हणाले, म’हिला वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करत असतात, मग ते घर असो किंवा कार्यालय. सामाजिक कार्यामध्येही महिला सहभागी असतात. रत्नागिरीत आता भरपूर महिला सीए कार्यरत आहेत. त्यांचा सन्मान प्रथमच शाखेने केला. भविष्यात रत्नागिरी शाखेच्या कार्यकारिणी समितीमध्ये महिलांनीही पुढाकार घ्यावा.’

अलीकडे सीएंवर कामाचा ताण वाढल्यामुळे या ताणतणावाचे नियोजन कसे करावे, मनःशांती कशी मिळवावी, त्यासाठी एकाग्रता, ध्यान या गोष्टींबद्दल सोनिया शिर्के यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. ताण-तणावापासून कसे दूर राहायचे याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तसेच सीएंसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स करण्याचे आवाहन केले.

(वरील फोटो : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे महिला सीएंचा सन्मान करण्यात आला. या वेळी शाखाध्यक्ष सीए बिपीन शहा, भूषण मुळ्ये व महिला सीए.)

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply