रत्नागिरीत ९ मे रोजी सापडले १३ नवे करोना रुग्ण

रत्नागिरी : आज (९ मे)सायंकाळी उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार मंडणगड येथे ११ आणि कळंबणी उपजिल्हा रुग्णालयांतर्गत २ अशा १३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

मंडणगड येथे ११ जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या सर्व अकरा जणांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. यातील ९ जण पंदेरी या गावातील असून, एक म्हाप्रळ व पालवणीचा एक आहे.
कळंबणी उपजिल्हा रुग्णालयांतर्गत जे २ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत,त्यां लवेल येथे क्वारंटाइन खाली ठेवण्यात आले होते.
या दोघांचाही मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ३४ झाली असून, त्यापैकी २६ जणांवर उपचार सुरू आहेत. पाच रुग्ण बरे झाले असून, एकाचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply