रत्नागिरीच्या करोना रुग्णांची संख्या ४२वर; आज नवे ८ रुग्ण सापडले

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आजही (१० मे) आठ नवे करोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ४२वर गेली आहे.

आज संगमेश्वर येथील चार जणांचे अहवाल प्राप्त झाले. हे चारही अहवाल पॉ‍झिटिव्ह आले आहेत. या सर्वांचे स्वॅब नमुने नऊ मे रोजी घेण्यात आले होते. या चौघांचाही मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.
यातील दोन जण चेंबूर येथून आले असून, एक जण कांदिवली येथून, तर एक जण पनवेल येथून आलेला आहे. या सर्वांना क्वांरटाईन करून ठेवण्यात आलेले होते.

आज रत्नागिरी शहर आणि परिसरातील ६ जणांचेही अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४ अहवाल पॉ‍झिटिव्ह आहेत. दोन अहवाल निगेटिव्ह आहेत. राजापूर येथीलही एक अहवाल प्राप्त झाला असून, तो अहवाल निगेटिव्ह आहे.

यामुळे आता जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४२ झाली आहे. नऊ मे रोजी एकाच दिवशी १३ रुग्ण सापडले होते.

Leave a Reply