रत्नागिरीतील आणखी १६ रुग्णांना करोनामुक्त झाल्याने घरी सोडले!

रत्नागिरी : गेले काही दिवस सातत्याने रत्नागिरी जिल्ह्यातील करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज (१९ मे) एक दिलासादायक बातमी आहे. आज १६ रुग्णांना करोनातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तसेच, आज प्राप्त झालेले १०८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील करोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ३३ एवढी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत करोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ९२ एवढी आहे. त्यातील ५६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात करोनाने तीन बळी घेतले आहेत.

आज जे १०८ अहवाल निगेटिव्ह आले, त्यातील ७४ रत्नागिरीतील, १८ संगमेश्वरमधील, १३ गुहागरमधील, तर तीन मंडणगडमधील होते.

Leave a Reply