रत्नागिरी : करोनामुळे लागू असलेल्या लॉकडाउनच्या नियमांमध्ये २२ मेपासून शिथिलता जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील ३२ मार्गांवर ५२ गाड्या २२ मेपासून धावणार आहेत. दरम्यान, एक जूनपासून देशभरात २०० विशेष रेल्वेगाड्या सुरू होणार असून, त्यांच्या आरक्षणाची सुविधा २२ मेपासून कोकण रेल्वेच्या विविध शहरांतील पब्लिक रिझर्व्हेशन काउंटरवरही सुरू होणार आहे. माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमळी, मडगाव, कारवार, उडपी, कुमटा, बेंदूर येथील पब्लिक रिझर्व्हेशन काउंटर २२ मेपासून सुरू होणार असल्याचे कोकण रेल्वेतर्फे कळवण्यात आले.
एसटीच्या गाड्या सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत धावणार आहेत. १० वर्षांपर्यंतची मुले आणि वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांना या एसटी गाड्यांतून प्रवास करता येणार नाही. एसटीच्या विभागीय कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली. प्रवाशांच्या मागणीनुसार या गाड्या धावणार आहेत. एका एसटीतून जास्तीत जास्त २२ प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. प्रवासी संख्या निम्मीच असली, तरी तिकीट दर नेहमीप्रमाणेच असतील. तसेच तिकीटदराच्या सर्व सवलतीही पूर्वीप्रमाणेच मिळणार आहेत, असे एसटीतर्फे स्पष्ट करण्यात आले. बस वाटेतल्या थांब्यांवर थांबणार का, याबाबत मात्र एसटीकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.
एसटीच्या ३२ मार्गांचा तपशील असा :
मंडणगड आगार – ३ मार्ग – रत्नागिरी, दापोली, खेड.
दापोली आगार – ४ मार्ग – रत्नागिरी, खेड, चिपळूण, मंडणगड.
खेड आगार – ४ मार्ग – रत्नागिरी, चिपळूण, दापोली, मंडणगड.
चिपळूण आगार – ४ मार्ग – रत्नागिरी, खेड, दापोली, मंडणगड.
गुहागर आगार – ३ मार्ग – आबलोली मार्गे रत्नागिरी, चिपळूण मार्गे रत्नागिरी, चिपळूण.
देवरूख आगार – ३ मार्ग – रत्नागिरी, साखरपा मार्गे लांजा, चिपळूण.
रत्नागिरी आगार – ५ मार्ग – दापोली, चिपळूण, राजापूर, नाटे, जयगड.
लांजा आगार – ४ मार्ग – पाली मार्गे रत्नागिरी, काजरघाटी मार्गे रत्नागिरी, साखरपा मार्गे देवरूख, राजापूर.
राजापूर आगार – २ मार्ग – रत्नागिरी, लांजा.
(एसटी गाड्यांसंदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित आगारात संपर्क साधावा.)
………………..
…..
(जिल्ह्यातील लॉकडाउन शिथिलतेसंदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)
छान निर्णय