रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२४ मे) करोनाचे १३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता १४५वर पोहोचली आहे. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जिल्हा माहिती कार्यालयाकडून ही माहिती मिळाली.
काल (२३ मे रोजी) जिल्ह्यातील सहा जण करोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते. तसेच, काल आलेले सर्व तपासणी अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे काल जिल्ह्यात एकाही रुग्णाची वाढ झाली नव्हती; मात्र रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांनुसार १३ नवे रुग्ण आढळल्याची माहिती साडेबारा वाजता देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या १४५ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४२ जणांना घरी सोडण्यात आले असून, ॲक्टिव्ह म्हणजेच सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ९८ आहे. आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने चौघांचा बळी घेतला आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात होम क्वारंटाइन असणाऱ्यांची संख्या ६२ हजार ५५२ असून, १३९ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
