‘कोविड-१९’साठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथीचे पूरक उपचार; राज्याच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : ‘कोविड-१९’च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत नागरिकांकरिता आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथिक औषधांबद्दलच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या विषयावरील कृती दलाची निर्मिती करण्यात आली होती. त्यांच्यातर्फे नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय, तसेच करोनाच्या लक्षणे नसलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. अर्थातच, हे उपचार करोनावरील मुख्य उपचारांना पूरक असल्याचे म्हणजेच डॉक्टरांकडून सुरू असलेल्या औषधोपचारांसोबत घ्यायचे आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. करोनाची लक्षणे जाणविल्यास तात्काळ चाचणी करून घेणे व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

सामान्य प्रतिबंधात्मक उपाय :

 • वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करणे.
 • वारंवार हात साबणाने २० सेकंदापर्यंत धुणे.
 • खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा.
 • ज्या व्यक्ती आजारी आहेत किंवा ज्यांना सर्दी, खोकला इत्यादी आजाराची लक्षणे आहेत, अशा व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळावा.
 • कच्चे, न शिजवलेले मांस खाणे टाळा.
 • पशुपालन गृह, तसेच जिवंत पशू विक्री केंद्र किंवा कत्तलखाने या ठिकाणी प्रवास टाळावा.

‘आयुष’च्या प्रतिबंधात्मक उपाययोजना

 • ताजे, गरम व पचायला हलके भोजन घ्यावे. भोजनात ऋतूनुसार भाज्यांचा समावेश असावा.
 • तुळशीची पाने, ठेचलेले आले व हळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे.
 • सर्दी व खोकल्यासाठी चिमूटभर काळी मिरी, चूर्ण मधातून सेवन करणे फायदेशीर आहे.
 • ‘कोविड-१९’ लक्षणांमध्ये तुळस, गुळवेल, आले आणि हळद या सामान्य औषधी वनस्पती उपयुक्त आहेत.
 • थंड, फ्रिजमध्ये ठेवलेले व पचायला जड असलेले पदार्थ टाळावेत.
 • थंड वाऱ्याचा थेट संपर्क टाळावा.
 • विश्रांती व वेळेत झोप हितकारक आहे.
 • प्रशिक्षित योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम व योगासने करावीत.
 • मूगडाळ पाण्यात उकळून तयार केलेले मुगाचे गरम कढण/सूप/पाणी प्यावे. ते पोषक आहे.
 • सुवर्ण दुग्ध : १५० मिली गरम दुधात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण मिसळून असे दूध दिवसातून एकदा किंवा दोनदा प्यावे.

रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी, रोगप्रतिबंधासाठी उपचार

आयुर्वेदीय

 • संशमनी वटी एक गोळी दिवसातून दोनदा, असे १५ दिवस
 • तुळस चार भाग, सुंठ दोन भाग, दालचिनी दोन भाग व काळी मिरी एक भाग या द्रव्यांपासून भरड चूर्ण तयार करणे. तीन ग्रॅम भरड चूर्ण १०० मिलिलिटर उकळलेल्या पाण्यात मिसळून ५-७ मिनिटे ठेवणे व नंतर हे पाणी पिणे.
 • १० ग्रॅम च्यवनप्राश सकाळी सेवन करणे (मधुमेही रुग्णांनी साखरविरहित च्यवनप्राश सेवन करावे.)
 • सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल / खोबरेल तेल बोटाने लावावे.
 • तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळ तेल/ खोबरेल तेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात. नंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चूळ भरावी. असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे.

युनानी

 • बिहिदाना ५ ग्रॅम, बर्गे गावजबान ७ ग्रॅम, उन्नाब ७ दाने, सपिस्तान ७ दाने, दालचिनी ३ ग्रॅम, बनपाशा ५ ग्रॅम हे साहित्य २५० मिलिलिटर पाण्यामध्ये १५ मिनिटे उकळावे. गरम असताना हा काढा चहाप्रमाणे दिवसातून एक किंवा दोन वेळा १५ दिवसांकरिता घ्यावा.
 • खमीरा मरवारीद दुधासोबत पाच ग्रॅम दिवसातून दोनदा घ्यावे. मधुमेही रुग्णांनी घेऊ नये.

होमिओपॅथिक
‘आर्सेनिकम अल्बम ३०’च्या चार गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्यावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा.

कोविड-१९सारखी लक्षणे असणाऱ्या इतर आजारांकरिता उपचार

आयुर्वेदीय

 • टॅबलेट आयुष्य ६४ (५०० मिलिग्रॅम) – या दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे.
 • अगस्त्य हरितकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्यावे.
 • अणुतेल किंवा तीळ तेल – दोन थेंब प्रति दिन सकाळी नाकपुडीत सोडणे.
 • ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा पाण्यात उकळून त्याची वाफ दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्यावी.
 • खोकला व घसा खवखवत असल्यास साखर अथवा मध यामध्ये लवंग चूर्ण मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.

युनानी

 • अर्धा ग्लास पाण्यामध्ये आरके अजिब ५ थेंब मिसळून गुळण्या कराव्यात. असे १५ दिवस करावे.
 • तिर्यक अर्बा – हब्बूल घर, ज्यूतिआना, मूर झरवंद तविल या सर्व घटकांचे चूर्ण तयार करून तुपामध्ये परतावे व मध गरम करून त्यामध्ये ही औषधे मिसळावीत. याचा वापर चूर्ण स्वरूपातही करता येतो, हे औषध १५ दिवस घ्यावे.

होमिओपॅथिक

 • ‘आर्सेनिकम अल्बम ३०’च्या चार गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्यावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा.
 • ब्रायोनिया अल्वा, हस टॉक्सिको डेन्ड्रॉन, बेलॉडोना जेलसेमियम, युप्याटोरियम, परफॉलीएटम ही औषधेदेखील सर्दी खोकला, फ्लू समान रोगांमध्ये चिकित्सेसाठी उपयुक्त्त ठरली आहेत.

कोविड-१९ पॉझिटिव्ह असलेल्या, लक्षणे नसलेल्या आणि चिकित्सालयीन तपासणीनुसार स्थिर असणाऱ्या व इतर वर्तमान गंभीर व्याधी नसलेल्या रुग्णांकरिता प्रस्थापित चिकित्सेला पूरक उपचार

आयुर्वेदीय

 • टॅबलेट आयुष्य ६४ – (५०० मिलिग्रॅम) दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे किंवा टॅबलेट सुदर्शन घनवटी – २५० मिलिग्रॅम दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे.
 • अगस्त्य हरितकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्यावे.
 • अणुतेल किंवा तीळतेल दोन थेंब प्रतिदिन सकाळी व संध्याकाळी नाकपुडीत सोडणे.
 • तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळ तेल किंवा खोबरेलतेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात. नंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चूळ भरावी. असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे.
 • गरम पाण्याची वाफ दोनदा किंवा तीनदा घ्यावी.

(ही सर्व औषधे आयुर्वेदिक, युनानी आणि होमिओपॅथी या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावीत.)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s