दहावी-बारावी निकालाच्या तारखा जाहीर नाहीत

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत गेल्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळाने अद्याप जाहीर केलेली नाही. तथापि निकालाच्या वेगवेगळ्या तारखा व्हॉटस्ॲप, फेसबुक वा सोशल मीडियावर परस्पर प्रसारित करण्यात येत आहेत. त्या तारखांवर विद्यार्थी आणि पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

निकालाची तारीख मंडळामार्फत मंडळाच्या अधिकृत ई-मेलद्वारे, प्रसिद्धीमाध्यमे आणि वर्तमानपत्रांमार्फत तसेच मंडळाच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याची सर्व संबंधित विद्यार्थी, पालक, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण विभागीय मंडळाच्या सचिवांनी केले आहे.

………………….

व्हॉट्सअॅप संपर्क : https://wa.me/919405959454

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply