सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांच्या नोंदणीसाठी उद्यम पोर्टल सुरू; मोफत, पेपरलेस नोंदणी

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाने (एमएसएमई) विकसित केलेले उद्यम नोंदणी पोर्टल एक जुलैपासून कार्यरत झाले आहे. २६ जून २०२० रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार उपक्रमांची/उद्योगांची वर्गवारी आणि नोंदणीची नवीन प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत, ऑनलाइन, पेपरलेस आणि सेल्फ-डिक्लरेशन अर्थात स्वतः दिलेल्या माहितीवर आधारित आहे. https://udyamregistration.gov.in/ येथे भेट देऊन उद्योजकांना नोंदणी करता येईल. ज्यांनी अगोदर अन्य कोणत्या यंत्रणेद्वारे नोंदणी केली असेल, त्यांनीही पुन्हा नोंदणी करणे आवश्यक आहे.

कोणी, कशी नोंदणी करायची याची संपूर्ण माहिती पोर्टलवर दिलेली आहे. यासाठी केवळ आधार क्रमांक लागणार आहे. नोंदणी झाल्यानंतर नोंदणीचे पत्रक मिळणार असून, ते कायमस्वरूपी असेल. म्हणजेच त्याच्या नूतनीकरणाची गरज लागणार नाही. त्यावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित उद्योगाबद्दलची आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

या संदर्भात मार्गदर्शनासाठी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाने चॅम्पियन्स नियंत्रण कक्ष आणि जिल्हा उद्योग केंद्रात एकखिडकी यंत्रणाही सुरू करण्यात आली आहे. या नवीन नोंदणी प्रक्रियेमुळे व्यवसाय सुलभीकरणाला प्रोत्साहन मिळेल आणि व्यवहारासाठी लागणारा वेळ आणि खर्च यात बचत होईल, अशी आशा मंत्रालयाने व्यक्त केली आहे. पोर्टल वगळता इतर कोणतीही खासगी ऑनलाइन किंवा ऑफलाइन प्रणाली, सेवा, एजन्सी किंवा व्यक्ती एमएसएमई म्हणून नोंदणी करण्यास अधिकृतपणे नेमलेली नाही, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
…….

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply