रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येने हजारी ओलांडली; ८९ नवे रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आजपर्यंतचे सर्वाधिक ८९ नवे करोनाबाधित एका दिवशी आढळले असून, जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या संख्येने हजारी ओलांडली आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३४ झाली आहे.

कालपासून आज (ता. १५ जुलै) सायंकाळपर्यंत मिळालेल्या अहवालांमध्ये ८९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १०४९ झाली आहे. नव्याने आढळलेल्या बाधित रुग्णांचे विवरण असे – रत्नागिरी १३, कळंबणी १७, घरडा, खेड २०, संगमेश्वर ३, कामथे १९, गुहागर १०, दापोली ७. त्यांच्यासह एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३६० आहे.

दरम्यान, २१ रुग्णांना बरे झाल्यानंतर आज घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६५५ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये घरडा येथील १, जिल्हा रुग्णालयातील ४, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे येथील १३, तर समाजकल्याण भवन, रत्नागिरी येथील तिघांचा समावेश आहे.

आडे (ता. दापोली) येथील ६२ वर्षीय महिला करोना रग्णांचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबाधित मृतांची संख्या आता ३४ झाली आहे.

जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोनमध्ये वाढ झाली असून, ती आता ८० झाली आहे. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा – रत्नागिरी १९, दापोली १०, खेड २१, लांजा ६, चिपळूण १७, मंडणगड ३, राजापूर ४.

संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या ११४ रुग्णांचे विवरण असे – जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी – ७३, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – १, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – ७, कोव्हिड केअर सेंटर पेढांबे ६, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी – २, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, लवेल – ८, ग्रामीण रुग्णालय, गुहागर- १, केकेव्ही, दापोली – १६. होम क्वॉरंटाइनखाली असलेल्या रुग्णांची संख्या १० हजार ४९१ आहे.

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण १२ हजार ८६४ नमुने करोनासाठी तपासण्यात आले असून, त्यापैकी १२ हजार ४१४ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील एक हजार ४९ अहवाल पॉझिटिव्ह, ११ हजार ४४२ निगेटिव्ह आहेत. आणखी ३५० नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. ही आकडेवारी जिल्हा रुग्णालयातील कोव्हिड-१९ कक्षाकडून मिळाली आहे.

होम क्वारंटाइन म्हणून शिक्का मारलेली कोणीही व्यक्ती बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांकावर, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ आणि २२६२४८ येथे किंवा आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृती दलांना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
………

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply