उद्यापासून एसटीची सेवा पूर्ण आसनक्षमतेने सुरू होणार

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसमधून सध्या निम्म्या क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू होती. १८ सप्टेंबर २०२०पासून पूर्ण आसन क्षमतेने एसटी वाहतूक सुरू केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखले जावे, या हेतूने बसच्या आसन क्षमतेच्या निम्म्या क्षमतेनेच वाहतूक सुरू करण्यात आली होती. १८ सप्टेंबरपासून मात्र पूर्ण आसन क्षमतेने बस चालवण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला असून, त्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. अर्थात, प्रवासादरम्यान प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक आहे. तसेच सॅनिटायझरचा वापर करणे आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेणे बंधनकारक आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. बस पूर्णपणे सॅनिटाइझ करूनच मार्गस्थ करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

सध्या लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेससाठी एका आसनावर एक प्रवासी अशा तिरप्या पद्धतीने आरक्षण उपलब्ध होते. आता वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होत असल्याने सर्व आसने आरक्षणासाठी पूर्वीप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

गुजरात आणि कर्नाटक राज्यांतील परिवहन महामंडळांकडून याआधीच पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे.

कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर २३ मार्च २०२०पासून मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविणे, कोल्हापूर – सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडणे, अशा प्रकारे समाजातील सर्व घटकांना सुरक्षित दळणवळण सेवा पुरविली आहे.

२२ मेपासून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. त्याद्वारे दररोज सुमारे १३०० बसेसमधून सरासरी ७२८७ फेऱ्यांतून अंदाजे दीड लाख प्रवाशांना एसटीने सुरक्षित सेवा पुरविली. २० ऑगस्टपासून आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्यात आली होती; मात्र ती निम्म्या प्रवासी क्षमतेने सुरू होती.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

प्रोफिशियंट अॅकॅडमीच्या वेबसाइटला नक्की भेट द्या : https://bit.ly/30tD3uz

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s