रेल्वे-एसटी करार, प्रवासी वाऱ्यावर

रेल्वे आणि एसटीच्या तिकिटांसाठी झालेल्या सामंजस्य करारापेक्षाही रेल्वेने येणारे प्रवासी हे एसटीचेही प्रवासी आहेत, अशा सामंजस्याच्या भूमिकेने एसटीने सेवा उपलब्ध करून दिली, तर प्रवाशांना त्याची अधिक आवश्यकता आहे. मनमानी भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांना त्यामुळे चाप तर बसेलच, पण एसटीच्या उत्पन्नातही चांगली वाढ होऊ शकेल.

सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी एसटी आगाराकडून टूर पॅकेज

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या रत्नागिरी विभागाने नाताळच्या, तसेच शनिवार-रविवारला जोडून येणाऱ्या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी माफक दरात टूर पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रवाशांच्या प्रतिसादानुसार पुढील मार्गांवर एसटी बस सेवा देण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे.

एसटीच्या स्मार्ट कार्ड सवलत योजनेला ३१ मार्च २०२१पर्यंत मुदतवाढ

मुंबई : करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड सवलत योजनेला ३० नोव्हेंबर २०२०पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन या योजनेला ३१ मार्च २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.

रत्नागिरीत एसटीची शहरी वाहतूक सेवा सहा महिन्यांनी सुरू

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक लॉकडाउनमुळे सहा महिने बंद असलेली एसटीची रत्नागिरीतील शहर वाहतूक सेवा (सिटी बस) आज (२१ सप्टेंबर) सुरू झाली. आज पहिल्या दिवशी ६५ फेऱ्या सोडण्यात आल्या.

रत्नागिरीत २१ तारखेपासून सिटी बस सुरू होणार

रत्नागिरी : १८ सप्टेंबरपासून राज्यातील एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. रत्नागिरीतील शहर बस सेवा (सिटी बस) सोमवारपासून (२१ सप्टेंबर) सुरू होणार आहे. रत्नागिरी विभागाकडून ही माहिती देण्यात आली.

उद्यापासून एसटीची सेवा पूर्ण आसनक्षमतेने सुरू होणार

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसमधून सध्या निम्म्या क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू होती. १८ सप्टेंबर २०२०पासून पूर्ण आसन क्षमतेने एसटी वाहतूक सुरू केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.