रत्नागिरीत २१ तारखेपासून सिटी बस सुरू होणार

रत्नागिरी : १८ सप्टेंबरपासून राज्यातील एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. रत्नागिरीतील शहर बस सेवा (सिटी बस) सोमवारपासून (२१ सप्टेंबर) सुरू होणार आहे. रत्नागिरी विभागाकडून ही माहिती देण्यात आली.

गेले अनेक दिवस शहर बस सेवा सुरू होणार असल्याचे बोलले जात होते; मात्र अखेर २१ सप्टेंबरपासून ही सेवा सुरळीत करण्याचा निर्णय महामंडळाच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे. आता शहर बससेवा वेळापत्रकाचे नियोजन करण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी सोमवारपासून केली जाईल; मात्र या बसेस टप्प्याटप्प्याने सोडल्या जाणार आहेत. पूर्वी दररोज ५० गाड्या सोडल्या जात होत्या. आता इतक्या गाड्या सोडण्यात येणार नाहीत; मात्र काही फेऱ्या प्रवासाच्या प्रतिसादानंतर सोडल्या जाणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

प्रोफिशियंट अॅकॅडमीच्या वेबसाइटला नक्की भेट द्या : https://bit.ly/30tD3uz

Leave a Reply