रत्नागिरीत ११९ आणि सिंधुदुर्गात ३७ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : आज (१८ सप्टेंबर) रत्नागिरी जिल्ह्यात नवे ११९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ६५३६ झाली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ३७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली.

रत्नागिरीतील परिस्थिती
आजच्या ११९ रुग्णांचा तालुकानिहाय आणि चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – दापोली २, खेड ३, चिपळूण ३, रत्नागिरी ३२, लांजा ९, राजापूर २ (एकूण ५१). रॅपीड अँटिजेन टेस्ट – दापोली ३, खेड ४, गुहागर ७, चिपळूण ३३, संगमेश्वर १, रत्नागिरी १६, लांजा ४. (एकूण ६८).

आज पाच पुरुषांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यातील तिघे चिपळूणचे, तर दोघे रत्नागिरीचे आहेत. रत्नागिरीतील दोघांचा मृत्यू काल, तर एकाचा आज झाला. चिपळूणच्या एकाचा मृत्यू गेल्या २१ ऑगस्टला, तर दुसरा मृत्यू १५ सप्टेंबरला झाला. त्या दोघांची नोंद आज झाली आहे. आजच्या नोंदींचा तपशील असा – रत्नागिरीतील तिघे मृत अनुक्रमे ५०, ५७ आणि ३५ वर्षे वयाचे आहेत. चिपळूणमधील एक मृत ९२ वर्षांचा, तर दुसरा ६५ वर्षांचा आहे.

तालुकानिहाय मृतांची संख्या अशी – मंडणगड २, खेड २८ दापोली २४, चिपळूण ४८, गुहागर ५, संगमेश्वर १७, रत्नागिरी ६०, लांजा ६, राजापूर ८. एकूण १९८. मृतांचे प्रमाण वाढून ३.२ टक्के झाले आहे. सध्या एकूण ११२१ जण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१८ सप्टेंबर) आणखी ३७ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २९२३ झाली आहे. आतापर्यंत १५५४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १३१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप ८५५ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५७ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८३९६ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १२ हजार ७२४ व्यक्ती आहेत.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरे, गावे, वाड्या-वस्ती व तांडे यातील प्रत्येक कुटुंबाला आरोग्य पथकातर्फे भेट दिली जात आहे. काही आजार असल्यास उपचार आणि आरोग्य शिक्षण या मोहिमेअंतर्गत देण्यात येत आहे. (फोटो खाली)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply