एसटीच्या स्मार्ट कार्ड सवलत योजनेला ३१ मार्च २०२१पर्यंत मुदतवाढ

मुंबई : करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड सवलत योजनेला ३० नोव्हेंबर २०२०पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन या योजनेला ३१ मार्च २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २७ विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यामध्ये ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडित असलेले स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलतधारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्यय नसल्याने, तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने या योजनेला ३१ मार्च २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मंत्री परब यांनी दिली आहे.

त्यामुळे ज्या भागात एसटी बसेस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलती लागू राहणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply